आयुष्य

प्रोत्साहन आणि प्रेरणा

प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे एक भावविश्व आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठेतरी व्यक्त व्हायचे आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्याचे क्षितिज मात्र कमी-अधिक प्रमाणात विस्तारलेले आहे. ज्यांच्या आयुष्याचे क्षितिज कमी विस्तारलेले आहे, ते क्षितिजाच्या पलीकडील गोष्टी जाणून घेण्यास अगदी आतुर असतात. म्हणूनच ‘ज्यांचे क्षितिज अधिक विस्तारलेले आहे’ अशा उंचीवरील माणसांकडून ते या अनोळखी प्रदेशातील गोष्टी मोठ्या कुतूहलाने ऐकत… Continue reading प्रोत्साहन आणि प्रेरणा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

बारगळलेली कामे

भविष्यातील अनिश्चीततेला बिचकून माणूस आजचे वर्तमान उद्याच्या भविष्यावर ढकलतो, तेंव्हा बारगळलेल्या कामांचे एक अदृष्य भूत मानवी मनाच्या मानगुटीवर बसते. बऱ्याचदा क्षणार्धात पूर्ण होणारे काम देखील कळत-नकळत अनंत क्षणांच्या प्रतीक्षेत ठेवले जाते. अशाप्रकारे बारगळलेल्या कामांमधून माणसाचे आयुष्यही रेंगाळत असते, ज्यास स्वतःला पूर्णत्त्वाची प्रतीक्षा असते. त्यामुळे ढकला ढकलीचा हा खेळ सदैव खेळत राहता येत नाही. आपल्यासमोरील विहित… Continue reading बारगळलेली कामे

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

विश्वासाची दिशा

जीवन म्हणजे एक अनोळखी प्रदेश. कोठेही न हरवता या अगम्य प्रदेशाची वाट तुडवायची झाल्यास जाणत्या वाटसरूचे दिशादर्शन अगत्याचे ठरते. पण जेंव्हा कधी माणसाला हरवल्यासारखे वाटते, तेंव्हा प्रत्येकवेळी त्याच्या आसपास कोणी विश्वासाचं असेलच असे नाही. अशावेळी त्यास स्वतःच्या हिमतीवर आयुष्याची अज्ञात वाट धुंडाळावी लागते. पूर्वी प्रत्येकाच्या आयुष्याचे धोपटमार्ग तसे ठरलेले असत. पण आज मानवी आयुष्याचे क्षितिज… Continue reading विश्वासाची दिशा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

सवयीचे नशीब

केवळ माणूसच नव्हे, तर इतर जीवही सवयीचे गुलाम असतात. पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या सवयींकडे निरखून पाहू शकतो आणि त्या सवयींना लक्षात घेऊन त्या बदलू शकतो. ज्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत, त्या सवयींचे बरे-वाईट परिणाम नशीब बनून आपल्या आयुष्यासमोर उभे ठाकतात. काही सवयी अशाही असतात, ज्या आपल्या लक्षात येतात, पण… Continue reading सवयीचे नशीब

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

महाराष्ट्र धर्म वाढवावा!

आज महाराष्ट्राकडे पाहिले असता माझ्या मनास एक प्रांजळ खंत लागून राहते. एव्हढी प्रामाणिक गुणवत्ता असणारा हा प्रदेश केवळ स्वतःला ओळखू न शकल्याने आजमितीस जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकला नाही. महाराष्ट्राने समाजसुधारकांचा सुधारणावादी वारसा जपत जर स्वतःकडे आदराने, आपुलकीने, उदारतेने लक्ष दिले असते, तर आजघडीला हा देश युरोपीय देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असता… Continue reading महाराष्ट्र धर्म वाढवावा!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

वैद्याकडे मनाचा इलाज काय!?

ज्या आजारांचे मूळ मनात खोलवर रुजलेले असते, त्यावर वैद्याकडे जाऊन इच्छित फळ ते काय मिळणार!? मनात रुजलेले आजार हे मनाचा कस लावूनच सोडवावे लागतात. मनास काही खटकते, तेंव्हा त्याची प्रतिक्रिया शरीरात उमटल्याशिवाय रहात नाही. मनाचा खेळ शरीर काहीकाळ झेलून घेते, पण अखेर निसर्गनियमानुसार मानवी शरीर दाद देऊ लागते. मनात दडलेल्या यातना आजाराच्या रूपाने प्रकट होऊ… Continue reading वैद्याकडे मनाचा इलाज काय!?

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आपल्यातील परकेपणा

आपल्यातील परकेपणा ही या जगातील एक मोठी शोकांतिकाच नव्हे, तर मानवाला लाभलेला शाप आहे! आपलाच आपल्यासाठी परका असेल, तर मग परका तो कोण ओळखावा!? आणि आयुष्याच्या नाजूक प्रवासात विश्वासाचा धागा तो काय मानावा!? व्यक्तीच्या मनापासून कुटुंबातील सदस्यांपर्यंत, लहानश्या खेड्यापासून संपूर्ण देशापर्यंत सर्वत्र आपल्यातील परकेपणा दिसून येतो. अनेकदा हा परकेपणा उघड नसतो, पण त्यातून निर्माण झालेली… Continue reading आपल्यातील परकेपणा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

माणूस आयुष्यभर एखाद्या गाढवाप्रमाणे मनाचे ओझे आपल्या पाठीवर बाळगून फिरत असतो. या मनुष्यरूपी गाढवास आपली पाठ कधी दिसत नाही, त्यामुळे आपण मनाचे निरर्थक ओझे बाळगत आहोत याचा त्यास कधी थांगपत्ता देखील लागत नाही. तो आपला आत्ममग्न होऊन चालत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यास भेटेल तो त्याच्या पाठीवर काही ठेऊन मार्गस्थ होतो आणि हा आपला गाढवासारखा काहीच… Continue reading गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आयुष्य पहावे आजमावून!

आयुष्य म्हणजे विचारांचा एक प्रवाह. समोर आल्या-गेल्या प्रसंगातून बरे-वाईट बहुरंगी विचार माणसाच्या मनात व पर्यायाने शरीरात उमटत राहतात. बहुतांशी विचारांतून तसे साध्य काही होत नाही, पण मनात व मनास वाहिलेल्यास थांबवणार कोण!? रोज सूर्यास्ताची वेळ येते, तेंव्हा असा हा मोकळा सायंवारा आपल्यासोबत ओळखीचेच पण आतून कुठेतरी अनोळखी आवाज अलवरपणे घेऊन येतो. या आवाजात जीवनाचे निरनिराळे… Continue reading आयुष्य पहावे आजमावून!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा

तन्मय भटने सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांच्यावर विनोद करण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे सध्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. अशाप्रकारचे प्रसंग व मुद्दे गुंतागुंतीचे असतात व  प्रत्येकजण आपापल्यापरिने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे हा प्रसंगही असाच काहीसा गुंतागुंतीचा आहे. तेंव्हा या लेखाच्या माध्यमातून मी माझ्या दृष्टिकोनातून त्यावर… Continue reading अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा