Uncategorized

पूर्वजांची पापे

सर्वकाही पूर्वीपासूनच ठरलेलं असतं, असं मानलं, तर मग प्रश्नच संपला! तेंव्हा मग काही लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे व करण्यासारखेही उरत नाही. त्यामुळे सर्वकाही पूर्वीपासून ठरलेलं नसतं, या गृहितकास धरुणच आपली कार्यधारणा असणं सर्वमान्य दृष्टीने भाग आहे. मूळात ‘पाप’ आणि ‘पुण्य’ म्हणजे काय? माझ्या मते आपली आध्यात्मिक पातळी वर घेऊन जाणारी उर्जा म्हणजे पुण्य, तर ही आध्यात्मिक पातळी… Continue reading पूर्वजांची पापे

Uncategorized

बिंडोक बापाची लक्षणे

दुचाकीवर समोर बसून बायकोवर चरफडणारा नवरा, त्याच्या समोर पेट्रोलच्या टाकीवर धास्तीने दडपून बसलेला ४-५ वर्षांचा लहान मुलगा, एका हाताने आपल्या कडेवरील बाळाला सावरत दुसर्‍या हातात सामानाच्या पिशव्या घेऊन कोमेजून बसलेली बायको! पूर्वी बाहेर रस्त्यावर सर्रास दिसणारे हे दृष्य! आजकाल असं दृष्य फारसं दिसत नाही.. पण कधी दिसलंच.. तर अजूनही धास्ती वाटते! कुठला तो सोम्या-गोम्या रांकेला… Continue reading बिंडोक बापाची लक्षणे

Uncategorized

वेळ लवकर जात आहे

गेल्या काही वर्षांपासून मला वेळ लवकर निघून जात असल्याची अनुभूती होत आहे! वेळ कसा येतोय आणि कसा जातोय? हे काही कळेनासे आहे. पण एक गोष्ट मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो की, ही काही माझ्या एकट्याचीच अनुभूती नाही. माझ्या मित्रपरिवाराच्या बोलण्यातूनही आजकाल अगदी हीच जाणिव व्यक्त होत आहे. माझं कॉलेज संपून जमाना झाला, तरी अजूनही मला… Continue reading वेळ लवकर जात आहे

Uncategorized

महाराष्ट्र दिन २०१५

‘महाराष्ट्र’ नावाच्या देशात जन्मास येणं ही खरं तर एक भाग्याचीच गोष्ट आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यादृष्टीने विचार करायला हवा. त्या त्या काळातील लोक, त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि त्याचा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा यावेळी लक्षात घ्यायला हवा. मानवी उत्कर्षाचा जो इतिहास या वर्तमानकाळात लिहिला जात आहे,… Continue reading महाराष्ट्र दिन २०१५

Uncategorized

माणूसपणाचे ओझे

माणूस स्वतः इतका आयुष्यात इतर कोणासमोरही हतबल होत नसेल. कधी परिस्थिती त्यास हतबल करते, कधी माणसे त्यास हतबल करतात आणि मग हळूहळू तो स्वतःसमोरच पूर्णतः हतबल होऊन जातो. पण मूळात तसं पहायला गेलं, तर केवळ परिस्थितीच त्यास हतबल करत असावी. काही लोक नशिबास दोष देऊन, तर काही लोक निर्लज्ज बनून माणूसपणाचे ओझे दूर करण्याचा प्रयत्न… Continue reading माणूसपणाचे ओझे

Uncategorized

चित्रपट, पुस्तक, अर्थसवय

आज मला ईपुस्तकांच्या विक्री संदर्भात बोलायचं आहे.. आणि त्याची तुलना ही चित्रपट व्यवसायाशी करायची आहे. चित्रपटाच्या तिकिटाचा दर हा साधरणतः २०० रुपये असतो, असे आपण गृहित धरु. इकडे एखादे पुस्तकही साधारणतः २०० रुपयांनाच मिळते. पण चित्रपटासाठी २०० रुपये खर्च करण्यास मागे-पुढे न पाहणार्‍या अनेक लोकांस २०० रुपयांचे पुस्तक विकत घेणे मात्र अगदी जीवावर येते. केवळ २… Continue reading चित्रपट, पुस्तक, अर्थसवय

Uncategorized

पटसृष्टीचे मराठीप्रेम

मराठी पट आता प्राईम टाईम मध्ये दाखवणं सक्तिचं केलं गेलं आहे. पण प्राईम टाईम म्हणजे नक्की कोणती वेळ? तर ज्यावेळी चित्रपट पाहण्याकरीता गर्दी होते अशी वेळ! कॉलेज मधली तरुण मुलं ही पटास दुपारी गर्दी करतात, तर नोकरदार मंडळींना रात्रीच्या वेळी पट पाहणं शक्य होतं. त्यामुळे त्या त्या पटविषयाच्या अनुशंगाने दुपारी १२ ते रात्री ९ दरम्यान… Continue reading पटसृष्टीचे मराठीप्रेम

Uncategorized

मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

शाळेय वयात पहाटे ४ वाजता ऊठून आभ्यास करावा असे जुनी-जाणती माणसे सांगत असत. एव्हाना घड्याळही घराघरात पोहचले होते, तेंव्हा थेट ४ चा गजर लावायचा! अर्थात मी अंतःप्रेरणेने ४ ला ऊठून कधी आभ्यास केलेला नाही, तरी परिक्षेच्या काळात आभ्यास झाला नसल्याकारणाने ऊठावं लागायचं! पण जुनी-जाणती माणसे सांगतात तशी प्रसन्नतेची अनुभूती काही मला ४ वाजता यायची नाही.… Continue reading मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

Uncategorized

वेळेचे विचित्र गणित

वेळ म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? अशा प्रश्नांचा लहानपणी कोणी फारसा विचार करत नाही. पण एके दिवशी अचानकच हे प्रश्न दत्त म्हणून समोर उभे ठाकतात! तेंव्हा अगदी अस्तित्त्वाशी निगडीत इतक्या महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधायची सोडून आसपासचं जग कोणत्या तंद्रीमध्ये फाल्तू प्रश्नांवरील उत्तरांच्यामागे पळत आहे? ते काही कळत नाही! नंतर समजतं की, ते प्रश्न प्रत्यक्षात माहित… Continue reading वेळेचे विचित्र गणित

Uncategorized

जागतिक चित्रपटाचे अर्थ’कारण

एखादे कार्य पूर्णत्त्वास न्यायचे म्हणजे त्यासाठी उर्जा ही लागतेच! पण एखादे मोठे कार्य करण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणावर उर्जा लागते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मराठी चित्रपटांस पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने जागतिक दर्जाचे (लोकप्रिय) चित्रपट बनवता येत नाहीत, असे काहीजणांचे मत असते, पण मला त्यात तितकेसे तथ्य वाटत नाही. अर्थात एखादी कलाकृती चांगल्या स्वरुपात सादर… Continue reading जागतिक चित्रपटाचे अर्थ’कारण