आयुष्य

मनीचे आयुष्य

मी जेंव्हा मनीकडे पाहतो, मला तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसते, कदाचित आईची काळजी असेल. तिच्या पिलांच्या चेहऱ्यांवर मात्र नाविण्याचं औत्सुक्य असतं, त्यांना आसपास वावरणाऱ्या, हलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मोठं कुतूहल वाटतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात मनी पहुडली होती, तेंव्हा तिचे एक पिलू दबा धरून उडणारी माशी पकडू पहात होते, तर आता त्यातील एक पिलू पकोळीचा पाठलाग करत आहे.… Continue reading मनीचे आयुष्य

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

परिघाबाहेरील जग

एका दृष्टीने विचार केला, तर सारे काही खूप सोपे असते; दुसऱ्या दृष्टीने विचार केला, तर सारे काही अत्यंत कठीण! आपण आयुष्याकडे कसे पाहतो त्यावर सारे काही अवलंबून आहे. आपणाला जे करायचे आहे ते कोणालातरी शक्य असते आणि जे कोणालातरी करायचे आहे ते आपल्याला शक्य असते. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सारे गुण क्वचितच कोणा… Continue reading परिघाबाहेरील जग

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

तंत्रज्ञान

सोलर पॉवर बँक

मला स्वतःला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची मनापासून आवड आहे. त्यामुळे काही काळापूर्वी मी सहजच एक ‘सोलर पॉवर बँक’ विकत घेतली होती. या पॉवर बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती उन्हामध्ये चार्ज होऊ शकते आणि त्यानंतर आपणाला आपला स्मार्टफोन या पॉवर बँकवर चार्ज करता येतो. थोडक्यात अप्रत्यक्षपणे सूर्याच्या ऊर्जेवर आपण आपला स्मार्टफोन चालवू शकतो. अंधारात व्यवस्थित दिसावे यासाठी यात… Continue reading सोलर पॉवर बँक

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

धैर्याने भरलेले आयुष्य

आयुष्य जर सुखाने जगायचे असेल, तर एकतर डोक्याने मूर्ख असावं लागतं किंवा मग अंगात धैर्य असावं लागतं. ज्याला डोकं आहे, पण धैर्य नाही त्याच्यासाठी आयुष्याचा मार्ग अतिशय खडतर आणि कठीण आहे. पण धैर्य नक्की येते कशातून? माणसाचे मन जर एका गोष्टीवर केंद्रित झाले असेल, तर त्याच्यासाठी बाकीच्या साऱ्या गोष्टी धूसर होत जातात. ज्या गोष्टी धूसर… Continue reading धैर्याने भरलेले आयुष्य

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आपण ‘प्रश्न’ आहात की ‘उत्तर’

अनेकदा एखादी कल्पना आपली वाट पहात आपल्या आसपास वावरत असते, पण आपण मात्र आपल्याच विचारात कुठेतरी हरवून गेलेलो असतो. आपण जेंव्हा भानावर येतो, तेंव्हा अचानक जाणवतं की, एव्हढी साधी गोष्ट आधीच आपल्या लक्षात का आली नाही! थोडक्यात अनेक कूटप्रश्नांची उत्तरं आपल्या आसपासच असतात, पण आपण मात्र कुठेतरी दूर निघून गेलेलो असतो, आपण केवळ भानावर येऊन… Continue reading आपण ‘प्रश्न’ आहात की ‘उत्तर’

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

समिक्षा

मानवी हृदयाला भिडणारे संगीत

इंग्लिश चित्रपटांमध्ये गाणी नसली, तरी त्यात पार्श्वसंगीताचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आलेला असतो. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील दृष्याला एक नवी उंची प्राप्त होते. इंग्लिश चित्रपटांच्या माध्यमातून मला इंग्लिश भाषेतील अनेक उत्तमोत्तम गाण्यांची ओळख झाली. आपल्याकडेही चित्रपट आणि कार्यक्रमांत पार्श्वसंगीताचा खूप चांगला वापर करण्यात आलेला असतो, पण हे संगीत युट्युब सारख्या माध्यमांवर स्वतंत्रपणे आढळून येत नसल्याने त्याचा आस्वाद… Continue reading मानवी हृदयाला भिडणारे संगीत

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

खगोलशास्त्र

हबल दुरदर्शिकेतील कार्यबिघाड आणि दुरुस्ती

या महिन्याच्या सुरुवातीला हबल मधील एक गायरोस्कोप निकामी झाल्याने या दुरदर्शिकेच्या कार्याला मर्यादा आली होती, परंतु हा कार्यबिघाड आता दुरुस्त झाला असल्याचे नासा कडून सांगण्यात येत आहे. गायरोस्कोपचा उपयोग दुरदर्शिकेला लक्ष्यावर स्थिर करण्यासाठी केला जातो. हबलला कार्यरत राहण्यासाठी एकाचवेळी कमीतकमी तीन गायरोस्कोपची आवश्यकता असते. हबल मधील तीन पैकी एक गायरोस्कोप निकामी झाल्यानंतर चौथे अतिरिक्त गायरोस्कोप… Continue reading हबल दुरदर्शिकेतील कार्यबिघाड आणि दुरुस्ती

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

मराठी महाराष्ट्र

मराठी माध्यमांकडून सुरू असलेली फसवणूक

जेंव्हा तुम्हाला वेळोवेळी गृहीत धरले जाते, तेंव्हा तो तुमच्या अस्तित्त्वाला अंकित करण्यासाठी केलेला एक कट असतो. प्रत्येक मराठी माणसाला हिंदी येते हे माध्यमांचे गृहीतक देखील असेच मराठी संस्कृतीला अंकित करू पहात आहे. आजच्या काळात मराठी माध्यमांतून केवळ हिंदी भाषेचाच नव्हे, तर हिंदी कार्यक्रमांचा देखील संचार होऊ लागला आहे. यास भाषिक उदारतेचा कितीही सोनेरी मुलामा दिला,… Continue reading मराठी माध्यमांकडून सुरू असलेली फसवणूक

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

मराठी महाराष्ट्र

marhathi.com : चळवळीचे एक उत्स्फूर्त संकेतस्थळ!

समाजमाध्यमावर लिहिणे म्हणजे अगदी प्रभावीपणे हवेत बोलण्यासारखे आहे. यावर लिहिलेले शब्द ज्या गतीने सर्वदूर पोहचतात, त्याच गतीने ते हवेत विरुनही जातात. दुसऱ्या बाजूला संकेतस्थळावर लिहिलेला एखादा लेख हा मागे पडत नाही किंवा हरवून जात नाही, तर तो कायम शोधण्याच्या अंतरावर उपलब्ध राहतो, ज्याचा पुढे संदर्भासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे समाजमाध्यमाच्या काळातही अनुदिनी (blog) आणि… Continue reading marhathi.com : चळवळीचे एक उत्स्फूर्त संकेतस्थळ!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

राजकारण

डॉनल्ड ट्रम्प : किमयागार की कॉन आर्टिस्ट?

कोणत्याही क्षेत्रात जर सर्वोच्च पदावर पोहचायचं असेल, तर एक तर तुम्हाला सर्वोत्तम असावं लागतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही सर्वोत्तम आहात हे तुम्हाला माहीत असावं लागतं. सर्वोत्तम असणं हे अव्यक्त असू शकतं, चांगल्या किंवा वाईट गुणवैशिष्ट्यांचं मिश्रण असू शकतं, पण जो खरंच सर्वोत्तम असतो, त्याला त्याच्या अंतरातम्यातून माहीत असतं की तो सर्वोत्तम आहे! काहीजण ट्रम्पनां जगातील… Continue reading डॉनल्ड ट्रम्प : किमयागार की कॉन आर्टिस्ट?