आयुष्य

बारगळलेली कामे

भविष्यातील अनिश्चीततेला बिचकून माणूस आजचे वर्तमान उद्याच्या भविष्यावर ढकलतो, तेंव्हा बारगळलेल्या कामांचे एक अदृष्य भूत मानवी मनाच्या मानगुटीवर बसते. बऱ्याचदा क्षणार्धात पूर्ण होणारे काम देखील कळत-नकळत अनंत क्षणांच्या प्रतीक्षेत ठेवले जाते. अशाप्रकारे बारगळलेल्या कामांमधून माणसाचे आयुष्यही रेंगाळत असते, ज्यास स्वतःला पूर्णत्त्वाची प्रतीक्षा असते. त्यामुळे ढकला ढकलीचा हा खेळ सदैव खेळत राहता येत नाही. आपल्यासमोरील विहित… Continue reading बारगळलेली कामे

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

वैद्याकडे मनाचा इलाज काय!?

ज्या आजारांचे मूळ मनात खोलवर रुजलेले असते, त्यावर वैद्याकडे जाऊन इच्छित फळ ते काय मिळणार!? मनात रुजलेले आजार हे मनाचा कस लावूनच सोडवावे लागतात. मनास काही खटकते, तेंव्हा त्याची प्रतिक्रिया शरीरात उमटल्याशिवाय रहात नाही. मनाचा खेळ शरीर काहीकाळ झेलून घेते, पण अखेर निसर्गनियमानुसार मानवी शरीर दाद देऊ लागते. मनात दडलेल्या यातना आजाराच्या रूपाने प्रकट होऊ… Continue reading वैद्याकडे मनाचा इलाज काय!?

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आपल्यातील परकेपणा

आपल्यातील परकेपणा ही या जगातील एक मोठी शोकांतिकाच नव्हे, तर मानवाला लाभलेला शाप आहे! आपलाच आपल्यासाठी परका असेल, तर मग परका तो कोण ओळखावा!? आणि आयुष्याच्या नाजूक प्रवासात विश्वासाचा धागा तो काय मानावा!? व्यक्तीच्या मनापासून कुटुंबातील सदस्यांपर्यंत, लहानश्या खेड्यापासून संपूर्ण देशापर्यंत सर्वत्र आपल्यातील परकेपणा दिसून येतो. अनेकदा हा परकेपणा उघड नसतो, पण त्यातून निर्माण झालेली… Continue reading आपल्यातील परकेपणा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

माणूस आयुष्यभर एखाद्या गाढवाप्रमाणे मनाचे ओझे आपल्या पाठीवर बाळगून फिरत असतो. या मनुष्यरूपी गाढवास आपली पाठ कधी दिसत नाही, त्यामुळे आपण मनाचे निरर्थक ओझे बाळगत आहोत याचा त्यास कधी थांगपत्ता देखील लागत नाही. तो आपला आत्ममग्न होऊन चालत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यास भेटेल तो त्याच्या पाठीवर काही ठेऊन मार्गस्थ होतो आणि हा आपला गाढवासारखा काहीच… Continue reading गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

हळहळणारा डॉक्टर

‘समस्या’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानसिक समस्या ही तर मानसिक समस्या असतेच! पण शारीरिक समस्या ही देखील मानसिक समस्या असते! कारण शारीरिक व्याधीचे ओरखडे मनासही घायळ करतात. मानसिक समस्येला गृहित धरण्याइतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही. पण आपणास जेंव्हा एखादी शारीरिक समस्या जाणवते, तेंव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध निष्णात… Continue reading हळहळणारा डॉक्टर

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

शून्यानंत परीक्षा

असंख्य पेशींच्या संवेदनांमधून प्रकट झालेले मानवी मन जेंव्हा स्वतःचा विचार करते, तेंव्हा त्यास काहीतरी चुकत असल्याचे कळून चुकते. स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करुनही ते त्यास जमत नाही, कारण त्याने स्वतःला कधी पाहिलेलेच नसते. खरंतर कोणीच कोणाचं नसतं, हे जेंव्हा त्यास आयुष्याच्या एका टप्यावर समजतं, तेंव्हा ते नकळत स्वतःशीच गप्पा मारु लागतं. रोज गप्पा मारता मारता ते स्वतःला जाणून घेण्याचा… Continue reading शून्यानंत परीक्षा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

वेळ लवकर जात आहे

गेल्या काही वर्षांपासून मला वेळ लवकर निघून जात असल्याची अनुभूती होत आहे! वेळ कसा येतोय आणि कसा जातोय? हे काही कळेनासे आहे. पण एक गोष्ट मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो की, ही काही माझ्या एकट्याचीच अनुभूती नाही. माझ्या मित्रपरिवाराच्या बोलण्यातूनही आजकाल अगदी हीच जाणिव व्यक्त होत आहे. माझं कॉलेज संपून जमाना झाला, तरी अजूनही मला… Continue reading वेळ लवकर जात आहे