आयुष्य

मनीचे आयुष्य

मी जेंव्हा मनीकडे पाहतो, मला तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसते, कदाचित आईची काळजी असेल. तिच्या पिलांच्या चेहऱ्यांवर मात्र नाविण्याचं औत्सुक्य असतं, त्यांना आसपास वावरणाऱ्या, हलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मोठं कुतूहल वाटतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात मनी पहुडली होती, तेंव्हा तिचे एक पिलू दबा धरून उडणारी माशी पकडू पहात होते, तर आता त्यातील एक पिलू पकोळीचा पाठलाग करत आहे.… Continue reading मनीचे आयुष्य

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

धैर्याने भरलेले आयुष्य

आयुष्य जर सुखाने जगायचे असेल, तर एकतर डोक्याने मूर्ख असावं लागतं किंवा मग अंगात धैर्य असावं लागतं. ज्याला डोकं आहे, पण धैर्य नाही त्याच्यासाठी आयुष्याचा मार्ग अतिशय खडतर आणि कठीण आहे. पण धैर्य नक्की येते कशातून? माणसाचे मन जर एका गोष्टीवर केंद्रित झाले असेल, तर त्याच्यासाठी बाकीच्या साऱ्या गोष्टी धूसर होत जातात. ज्या गोष्टी धूसर… Continue reading धैर्याने भरलेले आयुष्य

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आपण ‘प्रश्न’ आहात की ‘उत्तर’

अनेकदा एखादी कल्पना आपली वाट पहात आपल्या आसपास वावरत असते, पण आपण मात्र आपल्याच विचारात कुठेतरी हरवून गेलेलो असतो. आपण जेंव्हा भानावर येतो, तेंव्हा अचानक जाणवतं की, एव्हढी साधी गोष्ट आधीच आपल्या लक्षात का आली नाही! थोडक्यात अनेक कूटप्रश्नांची उत्तरं आपल्या आसपासच असतात, पण आपण मात्र कुठेतरी दूर निघून गेलेलो असतो, आपण केवळ भानावर येऊन… Continue reading आपण ‘प्रश्न’ आहात की ‘उत्तर’

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य · सामाजिक

कामामधून कार्याकडे

मानवी आयुष्य अगदी तकलादू आहे. एरव्ही सारे काही सुरुळीत सुरु असताना ही गोष्ट ध्यानातही येत नाही, परंतु आयुष्यात जेंव्हा एखादा प्रसंग चालून येतो, तेंव्हा आयुष्याच्या तकलादूपणाची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. प्रत्येकाची वेळ निरनिराळी असल्याने आयुष्याचे गांभीर्य सामूहिकपणे जाणवत नाही, परंतु मानवी जीवनात मात्र ते सुप्तपणे वावरत असते. या भानातूनच दुसर्‍याप्रति जबाबदारीची एक सखोल भावना मानवी… Continue reading कामामधून कार्याकडे

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

दिवसाचा दिवस

कधीकधी दिवस स्वतःचे खासपणाचे लोढणे आपल्या गळ्यात अडकवतो आणि स्वतः मात्र नामानिराळा होतो. अशाप्रकारे त्यास खास बनवण्याची नैतिक जबाबदारी उगाच आपल्या खांद्यावर येऊन पडते. तसे आपल्या दिवसाला आपले स्वतःचे असे आयुष्य वा अस्तित्त्व असते असे नाही. तो आपले आयुष्यही आपल्याच नजरेतून जगत असतो. आयुष्यचा सवंगडी आपले हळवे ऋणानुबंध आपल्या श्वासांमधून हळुवारपणे जपत असतो. दिवसाची एरव्ही… Continue reading दिवसाचा दिवस

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

बारगळलेली कामे

भविष्यातील अनिश्चीततेला बिचकून माणूस आजचे वर्तमान उद्याच्या भविष्यावर ढकलतो, तेंव्हा बारगळलेल्या कामांचे एक अदृष्य भूत मानवी मनाच्या मानगुटीवर बसते. बऱ्याचदा क्षणार्धात पूर्ण होणारे काम देखील कळत-नकळत अनंत क्षणांच्या प्रतीक्षेत ठेवले जाते. अशाप्रकारे बारगळलेल्या कामांमधून माणसाचे आयुष्यही रेंगाळत असते, ज्यास स्वतःला पूर्णत्त्वाची प्रतीक्षा असते. त्यामुळे ढकला ढकलीचा हा खेळ सदैव खेळत राहता येत नाही. आपल्यासमोरील विहित… Continue reading बारगळलेली कामे

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

विश्वासाची दिशा

जीवन म्हणजे एक अनोळखी प्रदेश. कोठेही न हरवता या अगम्य प्रदेशाची वाट तुडवायची झाल्यास जाणत्या वाटसरूचे दिशादर्शन अगत्याचे ठरते. पण जेंव्हा कधी माणसाला हरवल्यासारखे वाटते, तेंव्हा प्रत्येकवेळी त्याच्या आसपास कोणी विश्वासाचं असेलच असे नाही. अशावेळी त्यास स्वतःच्या हिमतीवर आयुष्याची अज्ञात वाट धुंडाळावी लागते. पूर्वी प्रत्येकाच्या आयुष्याचे धोपटमार्ग तसे ठरलेले असत. पण आज मानवी आयुष्याचे क्षितिज… Continue reading विश्वासाची दिशा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

सवयीचे नशीब

केवळ माणूसच नव्हे, तर इतर जीवही सवयीचे गुलाम असतात. पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या सवयींकडे निरखून पाहू शकतो आणि त्या सवयींना लक्षात घेऊन त्या बदलू शकतो. ज्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत, त्या सवयींचे बरे-वाईट परिणाम नशीब बनून आपल्या आयुष्यासमोर उभे ठाकतात. काही सवयी अशाही असतात, ज्या आपल्या लक्षात येतात, पण… Continue reading सवयीचे नशीब

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

माणूस आयुष्यभर एखाद्या गाढवाप्रमाणे मनाचे ओझे आपल्या पाठीवर बाळगून फिरत असतो. या मनुष्यरूपी गाढवास आपली पाठ कधी दिसत नाही, त्यामुळे आपण मनाचे निरर्थक ओझे बाळगत आहोत याचा त्यास कधी थांगपत्ता देखील लागत नाही. तो आपला आत्ममग्न होऊन चालत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यास भेटेल तो त्याच्या पाठीवर काही ठेऊन मार्गस्थ होतो आणि हा आपला गाढवासारखा काहीच… Continue reading गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आयुष्य पहावे आजमावून!

आयुष्य म्हणजे विचारांचा एक प्रवाह. समोर आल्या-गेल्या प्रसंगातून बरे-वाईट बहुरंगी विचार माणसाच्या मनात व पर्यायाने शरीरात उमटत राहतात. बहुतांशी विचारांतून तसे साध्य काही होत नाही, पण मनात व मनास वाहिलेल्यास थांबवणार कोण!? रोज सूर्यास्ताची वेळ येते, तेंव्हा असा हा मोकळा सायंवारा आपल्यासोबत ओळखीचेच पण आतून कुठेतरी अनोळखी आवाज अलवरपणे घेऊन येतो. या आवाजात जीवनाचे निरनिराळे… Continue reading आयुष्य पहावे आजमावून!