अर्थकारण

गुंतवणुकीमागील एक सोपा दृष्टिकोन

‘शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे सट्टा खेळण्यासारखे आहे’ असा एक सुप्त समज आपल्या समाजात खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या गुंतवणुकीबाबत अनेकांच्या मनात साशंकता असते, बरेचजण त्यापासून दूर राहणे पसंत करतात. पण मला वाटते केवळ आयुष्यातील व्यवहाराचे पुरेसे आकलन नसल्यामुळे हा समज जनमानसात पसरलेला आहे. म्हणूनच गुंतवणुकीकडे आज आपण काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या पद्धतीने विचार… Continue reading गुंतवणुकीमागील एक सोपा दृष्टिकोन

म्युच्युअल फंड

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

फेसबुक, अमेझॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची यशोगाथा अनेकांना प्रभावित करत असते. त्यामुळे या कंपन्यांच्या दैदीप्यमान वाटचालीत कुठेतरी सहभागी होता यावे असे एखाद्याला वाटू शकते, परंतु त्यासाठीचा सहजसोपा मार्ग मात्र त्यास ठाऊक असतोच असे नाही. अशावेळी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय कामी येऊ शकतो. कारण म्युच्युअल फंडद्वारे आपणाला केवळ भारतीय शेअर बाजारात नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांतही… Continue reading आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

पडझडीतून सुवर्णसंधीकडे

सध्या शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळू लागला आहे. तेंव्हा ज्यांचे पैसे प्रत्यक्ष बाजारात गुंतले आहेत त्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पडझडीच्या काळात नेहमीच्या तुलनेत गुंतवणूकदारांचे फोन वाढलेले असतात. बाजार कोसळत असताना अधिक नुकसान होण्यापूर्वी वेळीच आपले पैसे काढून घ्यावेत अशी त्यांची इच्छा असते. अशावेळी बाजारात होणारी पडझड ही खरे तर प्रत्यक्षात सुवर्णसंधी असल्याचे त्यांच्या लक्षात… Continue reading पडझडीतून सुवर्णसंधीकडे