समिक्षा

मानवी हृदयाला भिडणारे संगीत

इंग्लिश चित्रपटांमध्ये गाणी नसली, तरी त्यात पार्श्वसंगीताचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आलेला असतो. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील दृष्याला एक नवी उंची प्राप्त होते. इंग्लिश चित्रपटांच्या माध्यमातून मला इंग्लिश भाषेतील अनेक उत्तमोत्तम गाण्यांची ओळख झाली. आपल्याकडेही चित्रपट आणि कार्यक्रमांत पार्श्वसंगीताचा खूप चांगला वापर करण्यात आलेला असतो, पण हे संगीत युट्युब सारख्या माध्यमांवर स्वतंत्रपणे आढळून येत नसल्याने त्याचा आस्वाद… Continue reading मानवी हृदयाला भिडणारे संगीत

Uncategorized

चित्रपट, पुस्तक, अर्थसवय

आज मला ईपुस्तकांच्या विक्री संदर्भात बोलायचं आहे.. आणि त्याची तुलना ही चित्रपट व्यवसायाशी करायची आहे. चित्रपटाच्या तिकिटाचा दर हा साधरणतः २०० रुपये असतो, असे आपण गृहित धरु. इकडे एखादे पुस्तकही साधारणतः २०० रुपयांनाच मिळते. पण चित्रपटासाठी २०० रुपये खर्च करण्यास मागे-पुढे न पाहणार्‍या अनेक लोकांस २०० रुपयांचे पुस्तक विकत घेणे मात्र अगदी जीवावर येते. केवळ २… Continue reading चित्रपट, पुस्तक, अर्थसवय

व्यक्तिगत

कचर्‍याची फळे

मागचा लेख जिथे संपला तिथूनच आज पुढे लिहायला सुरुवात करतो. पण दोनही लेख तसे परस्परांवर अवलंबून नसल्याने त्यांस एकच शिर्षक दिलेले नाही. लॅपटॉपची बॅटरी घेतल्यानंतर आम्ही आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जायला निघलो. त्याच्याकडे जाण्यापूर्वी आम्ही मस्तानी पिण्यासाठी थांबलो. तो पैज हरला असल्याने मस्तानीचे पैसेही तोच देणार होता. दहा दिवसांपूर्वी त्याने मला फोन केला, तेंव्हा पावसाचे… Continue reading कचर्‍याची फळे

समिक्षा

अन्‌नोन – चित्रपट

लिआम निसन हा ‘अन्‌नोन’ या नावाप्रमाणेच रहस्यमयी अशा चित्रपटाचा नायक असून, त्याचा ‘टेकन’ हा सिनेमा मी यापूर्वी पाहिला आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट नक्कीच वाईट नसणार याची मला खात्री होती. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाच्या कथेत रहस्य असून, ही कथा आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ‘टेकन’ चित्रापटात लिआम निसन याने आपल्या मुलीची काळजी असलेल्या एका जबाबदार पित्याची भुमिका… Continue reading अन्‌नोन – चित्रपट