अर्थकारण

बाजारमूल्यानुसार कंपन्यांची वर्गवारी आणि गुंतवणूक

अॅपल कंपनीने १ ट्रिलियन डॉलरचे विक्रमी बाजारमूल्य गाठल्याची बातमी मध्यंतरी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. अॅपल पाठोपाठ अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट (गुगल) या कंपन्या देखील १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या सर्व कंपन्यांच्या बाजारमूल्यावरून आपणाला त्यांच्या भव्यतेची कल्पना आली असेल. या आघाडीच्या कंपन्यांचे जसे बाजारमूल्य आहे, तसेच शेअर बाजारातील प्रत्येक कंपनीचे आपले स्वतःचे एक बाजारमूल्य… Continue reading बाजारमूल्यानुसार कंपन्यांची वर्गवारी आणि गुंतवणूक

राजकारण

आघाडीच्या राजकारणामागील हालचाली

अलीकडच्या काळात आपण जर पाहिले, तर नितीन गडकरींचा चेहरा प्रसारमाध्यमांतून सतत दिसू लागला आहे. गडकरींनी आपल्या कामातून प्राप्त केलेल्या यशाचा आलेख अशाप्रकारे लोकांसमोर वारंवार मांडला जात असून भविष्यात सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत लागल्यास संघातर्फे गडकरींचे नाव पुढे केले जाऊ शकते अशी चर्चा आहे. परंतु स्वतः गडकरींनी मात्र अर्थातच या चर्चांचे खंडन केले आहे. तरी… Continue reading आघाडीच्या राजकारणामागील हालचाली

म्युच्युअल फंड

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

फेसबुक, अमेझॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची यशोगाथा अनेकांना प्रभावित करत असते. त्यामुळे या कंपन्यांच्या दैदीप्यमान वाटचालीत कुठेतरी सहभागी होता यावे असे एखाद्याला वाटू शकते, परंतु त्यासाठीचा सहजसोपा मार्ग मात्र त्यास ठाऊक असतोच असे नाही. अशावेळी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय कामी येऊ शकतो. कारण म्युच्युअल फंडद्वारे आपणाला केवळ भारतीय शेअर बाजारात नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांतही… Continue reading आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

तंत्रज्ञान

कॉर्ड कटिंग : टिव्हीचे भवितव्य!?

घर बदलल्यानंतर टिव्हीला नव्याने डिश जोडावी असे आम्हाला अजिबात वाटले नाही, मुळात त्याची गरजही जाणवली नाही. प्रत्येकाकडे स्वतःचा स्मार्टफोन होता, ज्यावर तो त्यास हवे ते हवे तेंव्हा जाहिरातींशिवाय पाहू शकत होता. त्यामुळे पुन्हा टीव्ही लावून घरातील शांतता भंग करण्याची किंवा अनावश्यक वेळ वाया घालवण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. नवीन ठिकाणी चांगली ब्रॉडबँड जोडणी मिळणे सुरवातीला कठीण… Continue reading कॉर्ड कटिंग : टिव्हीचे भवितव्य!?

अर्थकारण

रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम

सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार घसरण सुरू आहे. यानुषंगाने माझी जी काही प्राथमिक निरीक्षणे आहेत ती मी या इथे मांडत आहे. सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मुद्द्यापासून आपण सुरुवात करू! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सध्या वाढत असले, तरी त्यासोबतच रुपयाचे जे काही अवमूल्यन सुरू आहे, त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मालवाहतुकीचा खर्च… Continue reading रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार

गुंतवणूकदारांच्या निरनिराळ्या गरजा लक्षात घेऊन म्युच्युअल फंड योजना देखील वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश या सर्व प्रकारांची माहिती आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी ढोबळमानाने म्युच्युअल फंडचे जे ३ मुख्य प्रकार आहेत, त्यांची अगदी थोडक्यात माहिती घेऊ. इक्विटी फंड : अधिक परतावा, अधिक दोलायमानता शेअर बाजाराच्या माध्यमातून निरनिराळ्या कंपन्या भविष्यातील आपल्या वाढीसाठी गुंतवणूकदारांकडून… Continue reading म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार

म्युच्युअल फंड

पडझडीतून सुवर्णसंधीकडे

सध्या शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळू लागला आहे. तेंव्हा ज्यांचे पैसे प्रत्यक्ष बाजारात गुंतले आहेत त्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पडझडीच्या काळात नेहमीच्या तुलनेत गुंतवणूकदारांचे फोन वाढलेले असतात. बाजार कोसळत असताना अधिक नुकसान होण्यापूर्वी वेळीच आपले पैसे काढून घ्यावेत अशी त्यांची इच्छा असते. अशावेळी बाजारात होणारी पडझड ही खरे तर प्रत्यक्षात सुवर्णसंधी असल्याचे त्यांच्या लक्षात… Continue reading पडझडीतून सुवर्णसंधीकडे

खगोलशास्त्र

बाह्यचंद्र सापडल्याची शक्यता

या अथांग विश्वामध्ये आपल्या सूर्यमालेप्रमाणे इतरही अनेक सूर्यमाला आहेत. या सूर्यमालेतील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ (Exoplanet), तर अशा बाह्यग्रहांभोवती फिरणाऱ्या चंद्रांना ‘बाह्यचंद्र’ (Exomoon) असे म्हटले जाते. बाह्यग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, शिवाय ते आपल्यापासून अनेकानेक प्रकाशवर्षं दूर असतात, त्यामुळे त्यांचा शोध घेणे सहजासहजी शक्य होत नाही. दुसरीकडे बाह्यचंद्रांचा विचार केला, तर ते बाह्यग्रहांपेक्षा आकाराने खूप छोटे असतात, परिणामी… Continue reading बाह्यचंद्र सापडल्याची शक्यता

मराठी महाराष्ट्र

मराठीचे ‘यशस्वी’करण व्हावे!

जे नकळत केले जाते ते ‘अनुकरण’, तर जे विचारपूर्वक केले जाते ते ‘अनुसरण’. आयुष्यात यशाचे अनुकरण आणि अनुसरण करण्याकडे माणसाचा नैसर्गिक कल असतो. परंतु मुळात यश म्हणजे नक्की काय? नीट विचार केला असता आपल्या लक्षात येईल की यश ही एक सापेक्ष संकल्पना आहे. आपण यशस्वी नाही, असे एखाद्याला वाटू शकते, पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा… Continue reading मराठीचे ‘यशस्वी’करण व्हावे!

आयुष्य

एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा

प्रत्येकजण आयुष्याकडे निरनिराळ्या दृष्टीकोनातून पहात असतो व त्यानुसार यशाची आपापली व्याख्या ठरवत असतो. ‘यश कसे मिळवावे?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल आजवर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत, व्यख्याने देण्यात आली आहेत. त्यातून यशप्राप्तीमागील निरनिराळे पैलू उलगडले गेले असले, तरी या सर्व पैलूंमध्ये असा एक पैलू आहे जो यशप्राप्तीचा गाभा आहे. आयुष्यात ‘एकाग्रता’ असल्याशिवाय माणूस आपले इच्छित ध्येय… Continue reading एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा