सामाजिक

कालबाह्य शेती

माणूस पृथ्विवरील निसर्गाला हळूहळू वशीभूत करु लागला आहे. तेंव्हा पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारा शेती हा व्यवसाय आता कालबाह्य होताना दिसत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे मानवास सुखासाठी निसर्गाच्या कृपेवर अवलंबून रहावे लागणार नाही. उद्या माणसाचं पारंपारिक शेतवरील अवलंबत्त्व हे संपणारच आहे, आज केवळ त्या दिशेने एक हलकीशी सुरुवात झालेली आहे. हे अवलंबत्त्व… Continue reading कालबाह्य शेती

सामाजिक

प्रगल्भतेतून उन्नती

हळूहळू एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे की, आपल्याकडे केवळ आर्थिक दारिद्र्य नसून आपण बौधिकदृष्ट्यादेखील प्रचंड दरिद्री आहोत. मी लहान असताना मोठी माणसे लहानसहान गोष्टींत खोटं बोलून, दुसर्‍यास दोष देऊन, वेळ मारुन नेऊन आपलं बौधिक दारिद्र्य सोयीस्कर लपवून ठेवायचे! किंवा आपण बौधिकदृष्ट्या दरिद्री आहोत, हेच मुळात कळण्याइतकीही त्यांस बुद्धी नसावी. अर्थात मी समाजातील सर्वसाधाराण माणसाबद्दल… Continue reading प्रगल्भतेतून उन्नती

सामाजिक

रिकामटेकड्या बातम्या

मराठी बातम्यांची आणखी एक नवी वाहिनी सुरु होणार आहे आणि ‘उतारमतवादी’ नेतृत्त्वाखाली ही वृत्तवाहिनी चालवली जाणार आहे अशी ‘बातमी’ आहे. अधिच सतरा न्यूज चॅनल असताना त्यात आणखी एकाची भर पडावी यावरुनच सरासरी समाजास स्वतःचं सोडून सगळ्या जगाचं कित्ती पडलेलं असतं! हे नव्याने सिद्ध होतं! मूळात सर्वसाधारणपणे पत्रकार हे सर्वसामान्य प्रगल्भतेचे लोक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ताळतंत्र… Continue reading रिकामटेकड्या बातम्या

सामाजिक

अंधानुयायी

काही लोक स्वातंत्र्य मिळविण्याच्या आशेने आयुष्यभर कोणाचे तरी पारतंत्र्य स्विकारण्यात धन्यता मानतात. अशा ‘अंधानुयायी’ लोकांचा मेंदू नक्की कसा चालतो? हा संशोधकांच्या दृष्टीने एक आभ्यासाचा विषय ठरु शकतो. अंधानुयायांनी आपला मेंदू काही फुकट विकायला काढला आहे का? अशी शंका घेण्याइतपत ते आपल्या नेतृत्त्वाच्या प्रत्येक लहान-मोठ्या, योग्य-अयोग्य गोष्टींचे दिवसभर समर्थन करत असतात. ‘नेतृत्त्व’ स्विकारावे लागणे ही जगण्याची… Continue reading अंधानुयायी

सामाजिक

उतारमतवाद्यांची शोकांतिका

वर शिर्षकात मी ‘उतारमतवादी’ हे काही चुकून लिहिलेले नाही. ज्या उदारमतवाद्यांचा वैचारीक गाडा हा एखाद्या उतारावरुन घसरत जावा तसा आपला घसरत चाललेला असतो, त्यांस मी ‘उतारमतवादी’ असे म्हणतो. कारण अशा उतारमतवाद्यांस ‘उदारमतवादी’ म्हणनं म्हणजे ‘उदारमतवादी’ या शब्दाची किंमत कमी करण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीचा साकल्याने, सम्यकतेने, न्याय दृष्टीने विचार करण्याइतकी उतारमतवाद्यांची बौद्धिक पात्रता नसते. केवळ एकांगी… Continue reading उतारमतवाद्यांची शोकांतिका

सामाजिक

पत्रकारांची जगबुडी

‘आजकाल दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे’, ‘माणसाची नितीमूल्य हरवत चालली आहेत’, असं जर मी लिहिलं, तर काही लोकांस वाटेल.. अरे व्वा व्वा! काय सुंदर सुरुवात केली! आज काहीतरी विशेष रुचकर वाचायला मिळणार! पण तशी अपेक्षा बाळगल्यास भ्रमनिरास होण्याचीच शक्यता अधिक असून माझ्या दृष्टीने ही जागात सर्वत्र सर्रास वापरली जाणारी तद्दन फाल्तू व निराधार विधाने… Continue reading पत्रकारांची जगबुडी

सामाजिक

मराठ्यांनो गुंतवणूक करा!

आपला महाराष्ट्र हा पारंपारिक व्यापारी मार्गादरम्यान लागत नव्हता, तेंव्हा आपल्या पूर्वजांचा काही व्यापाराशी संबंध आला नाही. त्यामुळे मराठी लोकांमध्ये व्यवहारज्ञान हे तसे कमीच दिसून येते. अशाने पहिल्या पिढीतील अनेक मराठी व्यापारी अपयशी ठरले. त्यामुळे आपल्या समाजात सर्वत्र आर्थिक गैरसमज व त्यातून निर्माण झालेली अनाठायी भिती दिसून येते. मराठी माणसाला उद्योग-व्यवसाय करता येत नाही, असं म्हटलं… Continue reading मराठ्यांनो गुंतवणूक करा!

सामाजिक

प्रगल्भ विचारांची हत्या

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पुस्तक मी काही वर्षांपूर्वी वाचले असले, तरी ते मी काही फार गंभिरतेने वाचले नव्हते. त्यामुळे त्या पुस्तकाचे नाव माझ्या लक्षात राहिले असले, तरी गोविंद पानसरे हे त्याचे लेखक होते, हे मी पुरते विसरुन गेलो होतो. शिवाय ते कोण होते? त्यांचे कार्य काय? याबाबत मला काडीमात्र माहिती नव्हती, हे मी इथे खेदाने… Continue reading प्रगल्भ विचारांची हत्या

सामाजिक

शिवराय व महाराष्ट्र धर्म

युगपुरुषांचे विचार हे शाश्वत सत्यावर आधारलेले असतात आणि म्हणूनच ते अनादीअनंत काळापर्यंत चिरतरुण राहतात. त्यांस काळाच्या मर्यादा नसतात.. ते कालबाह्य होत नाहीत. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वलयही असेच साक्षात काळाला नामोहरम करणारे आहे. सर्वसामान्यांच्या हृदयात त्यांचे दिशादर्शक स्थान धृवतार्‍याप्रमाणे अढळ आहे. त्यांनी निर्माण केलेला स्फुर्तीचा झरा आज अनेक शतके उलटूनही रोमारोमांत अखंड वहतो आहे. एखाद्या दंतकथेतील… Continue reading शिवराय व महाराष्ट्र धर्म

सामाजिक

मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य

मागच्या आठवड्यात नवीन टि.व्ही, फ्रिजची खरेदी केली. तो एक आनंददायी अनुभव होता. शोरुममधील सेल्समन पासून बिल करणार्‍या लोकांपर्यंत सर्वजण मराठी होते. त्यानंतर घरी वस्तूंची डिलिव्हरी करणारे आणि प्रत्यक्ष डेमो दाखवणारे लोकही मराठीच होते. त्यांनी स्वतःहून लावलेला योग्य दर, त्यांची विनयशीलता, कामाप्रती असलेली एकनिष्ठता पाहून मनास अत्यंत समाधान वाटले. आजकाल मराठी लोक अधिक नम्र, समाधानी, प्रामाणिक… Continue reading मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य