समिक्षा

मानवी हृदयाला भिडणारे संगीत

इंग्लिश चित्रपटांमध्ये गाणी नसली, तरी त्यात पार्श्वसंगीताचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आलेला असतो. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील दृष्याला एक नवी उंची प्राप्त होते. इंग्लिश चित्रपटांच्या माध्यमातून मला इंग्लिश भाषेतील अनेक उत्तमोत्तम गाण्यांची ओळख झाली. आपल्याकडेही चित्रपट आणि कार्यक्रमांत पार्श्वसंगीताचा खूप चांगला वापर करण्यात आलेला असतो, पण हे संगीत युट्युब सारख्या माध्यमांवर स्वतंत्रपणे आढळून येत नसल्याने त्याचा आस्वाद… Continue reading मानवी हृदयाला भिडणारे संगीत

समिक्षा

अन्‌नोन – चित्रपट

लिआम निसन हा ‘अन्‌नोन’ या नावाप्रमाणेच रहस्यमयी अशा चित्रपटाचा नायक असून, त्याचा ‘टेकन’ हा सिनेमा मी यापूर्वी पाहिला आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट नक्कीच वाईट नसणार याची मला खात्री होती. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाच्या कथेत रहस्य असून, ही कथा आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ‘टेकन’ चित्रापटात लिआम निसन याने आपल्या मुलीची काळजी असलेल्या एका जबाबदार पित्याची भुमिका… Continue reading अन्‌नोन – चित्रपट

समिक्षा

मॅक्झिम गॉर्की : आई – भाग २

एखादे आत्मचरित्र किंवा खर्‍या जीवनाची पार्श्वभूमी असलेली कादंबरी आपण जेंव्हा वाचत असतो, तेंव्हा काही क्षण स्वतःहाचे जीवन विसरून त्या कथानायकांच्या जीवनाशी समरस होतो. तेंव्हा वाटू लागतं की, जीवनात एवढी मोठी दुःखं, संकटं आहेत तरी हे लोक त्यांच्याकडे किती सहज दृष्टीने पाहतात आणि मी माझ्या किती क्षुल्लक गोष्टी मनात घेऊन बसलो आहे. जेंव्हा माणसासमोर उदात्त ध्येय… Continue reading मॅक्झिम गॉर्की : आई – भाग २

समिक्षा

मॅक्झिम गॉर्की : आई – भाग १

अन्ना किरिलोवना व त्यांचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या खर्‍या जीवनातील व्यक्तिरेखांना आपल्या नजरेसमोर ठेवून लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी त्यांची ‘आई’ ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी इ.स. १९०७ साली म्हणजेच आजपासून शंभर वर्षांपूर्वी रशियात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लिहीली गेली होती. लेखक मॅक्झिम गॉर्की हे स्वतः त्या चळवळीचे सभासद होते. प्योत्र झलोमोव याला त्यांनी त्यांच्या कादंबरीत… Continue reading मॅक्झिम गॉर्की : आई – भाग १