आयुष्य · माहिती · व्यक्तिगत · सामाजिक

ट्विटरकट्टा ३३ – महाराष्ट्राची वैचारिकता अद्ययावत व्हावी!

१ जानेवारी २०१८ या दिवशी ‘ट्विटरकट्टा’, ‘मराठी ब्रेन’, आणि ‘मराठी विचारधन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ट्विटरकट्टा’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे ३३वे सत्र माझ्यासोबत पार पडले. ‘मराठी भाषा पंधरवडा’ सुरु होत असताना अशाप्रकारे पहिल्याच दिवशी एक उत्तम योग जुळून यावा ही गोष्टही उल्लेखनीय आहे. रात्री ९.३० वाजता प्रश्नांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आणि हा कार्यक्रम एव्हढा रंगला… Continue reading ट्विटरकट्टा ३३ – महाराष्ट्राची वैचारिकता अद्ययावत व्हावी!

व्यक्तिगत

नव्या वर्षाची जुनी सुरुवात

‘मानलं तर आहे, मानलं तर नाही’, बहुदा हाच जीवनाचा जादूई मंत्र असावा. काही लोक आजच्या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात मानतात, तर काही लोक गुढीपाडव्याचा आग्रह धरतात. जगभरातही नवे वर्ष एकाचवेळी सुरु होत नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात सुरु झालेला नव्या वर्षाचा जल्लोश दिवसभरात संपूर्ण जगाची फेरी मारुन पुन्हा त्यांच्याच शेजारी येऊन थांबतो. रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरु… Continue reading नव्या वर्षाची जुनी सुरुवात

व्यक्तिगत

जुन्या वर्षाची सांगता

या वर्षाची सुरुवात झाली, तेंव्हा नवीन वर्ष सुरु झाले होते. तरी आता नवीन वर्ष न संपता, जुन्या वर्षाची सांगता होत आहे. मग नवीन वर्ष गेले कुठे? नवीन गोष्टी नुसत्याच येतात! आणि जुन्या गोष्टी नुसत्याच जातात! त्यामुळे जीवनाचे कोडे काही सुटत नाही! आता ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’, असं म्हणतात. पण टाकणार काय?… Continue reading जुन्या वर्षाची सांगता

व्यक्तिगत

हुंदडणारा आनंद

‘बाहेर हुंदडण्यातच जीवनाचा आनंद दडलेला आहे!’, असा वरकरणी सरासरी समाजाचा सिद्धांत दिसतो. ज्यांना असं हुंदडून खरोखरच आनंद मिळतो, त्यांचं ठिक आहे! पण ज्यांना असं निरर्थक हुंदडून आनंद मिळत नाही, त्यांचा मात्र उगाचच गोंधळ होतो! त्याचं होतं असं, की, बाहेर कारण नसताना हुंदडायची तर ईच्छा नसते.. पण मग हुंदडलं नाही, तर आसपासचे लोक असा समज करुन… Continue reading हुंदडणारा आनंद

व्यक्तिगत

ब्लॉगची सहामाही वाटचाल

या ब्लॉगला कोणी नियमित वाचक असेल असे मला वाटण्याचे काही कारण नाही. कारण या ब्लॉगच्या फीडचा पत्ता बदलल्यानंतर एकानेही या ब्लॉगला सब्स्क्राईब केल्याचे माझ्या निदर्शनास आलेले नाही, आणि गेल्या सहा महिन्यात या ब्लॉगवर एखादी प्रतिक्रियादेखील आलेली नाही. तरी या ब्लॉगला रोज कोणी ना कोणी भेट देत राहतं, हे मात्र नक्की! ‘मराठी ब्लॉग विश्व’ आणि ‘मराठी… Continue reading ब्लॉगची सहामाही वाटचाल

व्यक्तिगत

राँग कॉलिंग

राँग नंबर लावणार्‍या लोकांचं मला काही कळतच नाही! परवादिवशी मला एका अनोळखी नंबर वरुन फोन आला. मी थोडा वेळ वाट पाहिली.. पण जेंव्हा ‘ट्रू कॉलर’ हात हलवत परत आला, तेंव्हा मी नाईलाजाने फोन उचलला. ‘हॅलो अक्षय आहे का?’, साधारण एका खेडवळ मध्यमवयीन बाईचा तो आवाज वाटत होता. मी म्हटलं, ‘नाही.. राँग नंबर’. पण एव्हढ्यावरच संवाद थांबवेल… Continue reading राँग कॉलिंग

व्यक्तिगत

कचर्‍याची फळे

मागचा लेख जिथे संपला तिथूनच आज पुढे लिहायला सुरुवात करतो. पण दोनही लेख तसे परस्परांवर अवलंबून नसल्याने त्यांस एकच शिर्षक दिलेले नाही. लॅपटॉपची बॅटरी घेतल्यानंतर आम्ही आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जायला निघलो. त्याच्याकडे जाण्यापूर्वी आम्ही मस्तानी पिण्यासाठी थांबलो. तो पैज हरला असल्याने मस्तानीचे पैसेही तोच देणार होता. दहा दिवसांपूर्वी त्याने मला फोन केला, तेंव्हा पावसाचे… Continue reading कचर्‍याची फळे

व्यक्तिगत

लॅपटॉपची नवी बॅटरी

चुकीचे राऊटर विकत घेतल्याने माझा ऑनलाईन शॉपिंग वरचा विश्वास उडाला आहे, अशातला काही भाग नाही. पण नक्की कोणत्या प्रकारची बॅटरी ही माझ्या लॅपटॉपच्या विशिष्ट मॉडेलसाठी चालेल? हे माहित नसल्याने मी ती प्रत्यक्ष दुकानात जाऊन घ्यायचे पूर्वीच ठरवले होते. काल रविवार असल्याने मित्राला सुट्टी होती. त्यामुळे सकाळी फोन करुन मी त्यास दीड तासाने पुलाखाली येण्यास सांगितले. आता… Continue reading लॅपटॉपची नवी बॅटरी

व्यक्तिगत

मनःस्तापाची शिकवण

गोष्ट तशी फार मोठी नाहीये. आमच्या जुन्या वाय-फायची रेंज घरात सर्वत्र पोहचत नाही. तेंव्हा नेहमीप्रमाणे घेऊयात.. घेऊयात करत तीन-चार दिवसांपूर्वी एक नवीन, चांगला वाय-फाय राऊटर ऑनलाईन खरेदी केला. काल तो मला मिळाला. म्हटलं.. रेंजचा प्रश्न तर सुटला! पण काल दिवसभर लाईट नव्हती, तेंव्हा संध्याकाळ झाल्याशिवाय मला त्या नवीन राऊटची जोडणी करणे शक्य नव्हते. आता नवीन… Continue reading मनःस्तापाची शिकवण

व्यक्तिगत

अहो.. जाऽऽहो!

मराठीमध्ये असलेल्या या ‘आहो-जाहो’मुळे माझ्या वयाच्या व्यक्तिस अनेकदा विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. लोकांना माझ्याकडे पाहून कळत नाही की, याला ‘आहो-जाहो’ बोलावं? की सरळ ‘अरे-तुरे’ करावं!? त्यामुळे संवाद सुरु असताना कधी ते एखाद्या वाक्यात ‘आहो-जाहो’ घालून माझा सन्मान वाढवतात, तर लगेच पुढील वाक्यात ‘अरे-तुरे’ करत हार-तुरे काढून घेऊन खाली पाडतात. थोडक्यात ते मला ‘घालून-पाडून’ बोलतात!… Continue reading अहो.. जाऽऽहो!