आयुष्य

विश्वासाची दिशा

जीवन म्हणजे एक अनोळखी प्रदेश. कोठेही न हरवता या अगम्य प्रदेशाची वाट तुडवायची झाल्यास जाणत्या वाटसरूचे दिशादर्शन अगत्याचे ठरते. पण जेंव्हा कधी माणसाला हरवल्यासारखे वाटते, तेंव्हा प्रत्येकवेळी त्याच्या आसपास कोणी विश्वासाचं असेलच असे नाही. अशावेळी त्यास स्वतःच्या हिमतीवर आयुष्याची अज्ञात वाट धुंडाळावी लागते. पूर्वी प्रत्येकाच्या आयुष्याचे धोपटमार्ग तसे ठरलेले असत. पण आज मानवी आयुष्याचे क्षितिज… Continue reading विश्वासाची दिशा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

सवयीचे नशीब

केवळ माणूसच नव्हे, तर इतर जीवही सवयीचे गुलाम असतात. पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या सवयींकडे निरखून पाहू शकतो आणि त्या सवयींना लक्षात घेऊन त्या बदलू शकतो. ज्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत, त्या सवयींचे बरे-वाईट परिणाम नशीब बनून आपल्या आयुष्यासमोर उभे ठाकतात. काही सवयी अशाही असतात, ज्या आपल्या लक्षात येतात, पण… Continue reading सवयीचे नशीब

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आपल्यातील परकेपणा

आपल्यातील परकेपणा ही या जगातील एक मोठी शोकांतिकाच नव्हे, तर मानवाला लाभलेला शाप आहे! आपलाच आपल्यासाठी परका असेल, तर मग परका तो कोण ओळखावा!? आणि आयुष्याच्या नाजूक प्रवासात विश्वासाचा धागा तो काय मानावा!? व्यक्तीच्या मनापासून कुटुंबातील सदस्यांपर्यंत, लहानश्या खेड्यापासून संपूर्ण देशापर्यंत सर्वत्र आपल्यातील परकेपणा दिसून येतो. अनेकदा हा परकेपणा उघड नसतो, पण त्यातून निर्माण झालेली… Continue reading आपल्यातील परकेपणा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

माणूस आयुष्यभर एखाद्या गाढवाप्रमाणे मनाचे ओझे आपल्या पाठीवर बाळगून फिरत असतो. या मनुष्यरूपी गाढवास आपली पाठ कधी दिसत नाही, त्यामुळे आपण मनाचे निरर्थक ओझे बाळगत आहोत याचा त्यास कधी थांगपत्ता देखील लागत नाही. तो आपला आत्ममग्न होऊन चालत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यास भेटेल तो त्याच्या पाठीवर काही ठेऊन मार्गस्थ होतो आणि हा आपला गाढवासारखा काहीच… Continue reading गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

आयुष्य पहावे आजमावून!

आयुष्य म्हणजे विचारांचा एक प्रवाह. समोर आल्या-गेल्या प्रसंगातून बरे-वाईट बहुरंगी विचार माणसाच्या मनात व पर्यायाने शरीरात उमटत राहतात. बहुतांशी विचारांतून तसे साध्य काही होत नाही, पण मनात व मनास वाहिलेल्यास थांबवणार कोण!? रोज सूर्यास्ताची वेळ येते, तेंव्हा असा हा मोकळा सायंवारा आपल्यासोबत ओळखीचेच पण आतून कुठेतरी अनोळखी आवाज अलवरपणे घेऊन येतो. या आवाजात जीवनाचे निरनिराळे… Continue reading आयुष्य पहावे आजमावून!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

हळहळणारा डॉक्टर

‘समस्या’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानसिक समस्या ही तर मानसिक समस्या असतेच! पण शारीरिक समस्या ही देखील मानसिक समस्या असते! कारण शारीरिक व्याधीचे ओरखडे मनासही घायळ करतात. मानसिक समस्येला गृहित धरण्याइतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही. पण आपणास जेंव्हा एखादी शारीरिक समस्या जाणवते, तेंव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध निष्णात… Continue reading हळहळणारा डॉक्टर

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

शून्यानंत परीक्षा

असंख्य पेशींच्या संवेदनांमधून प्रकट झालेले मानवी मन जेंव्हा स्वतःचा विचार करते, तेंव्हा त्यास काहीतरी चुकत असल्याचे कळून चुकते. स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करुनही ते त्यास जमत नाही, कारण त्याने स्वतःला कधी पाहिलेलेच नसते. खरंतर कोणीच कोणाचं नसतं, हे जेंव्हा त्यास आयुष्याच्या एका टप्यावर समजतं, तेंव्हा ते नकळत स्वतःशीच गप्पा मारु लागतं. रोज गप्पा मारता मारता ते स्वतःला जाणून घेण्याचा… Continue reading शून्यानंत परीक्षा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

परग्रहवासियाचे हास्य

काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी कानावर आली की, ज्यामुळे ‘प्राचीन परग्रहवासी प्रवासी सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांना’ अक्षरशः वेड लागायचंच तेव्हढं बाकी उरलं असेल!’. कारण मुख्य प्रवाहातील काही शास्त्रज्ञांनी इथून दीड हजार प्रकाशवर्ष दूर अतिप्रगत संस्कृती नांदत असल्याची शक्यता व्यक्त केली. मिचिओ काकू यांच्या फुटपट्टीवर अशाप्रकारच्या संस्कृतीची गणना करायची झाल्यास यास ‘प्रकार २ची संस्कृती’ म्हणता येईल. कारण ही… Continue reading परग्रहवासियाचे हास्य