म्युच्युअल फंड

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड

बाजारमूल्यानुसार शेअर बाजारात ज्या कंपन्यांचा क्रमांक २५१ पासून पुढे येतो त्यांचा समावेश स्मॉल कॅप विभागात केला जातो. स्मॉल कॅप कंपन्या पुरत्या स्थिरस्थावर झालेल्या नसतात, त्यामुळे स्मॉल कॅप प्रकारातील गुंतवणुकीवर होणारा नफा किंवा तोटा हा अधिक असू शकतो. थोडक्यात स्मॉल कॅप समभागांची दोलायमानता जास्त असल्याने त्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील जोखीमही वाढीस लागते. परिणामी अशाप्रकारच्या कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक… Continue reading स्मॉल कॅप म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

मिड कॅप म्युच्युअल फंड

बाजरामूल्यानुसार शेअर बाजारात ज्या कंपन्या १०१ ते २५० क्रमांकात मोडतात त्यांची गणना ‘मिड कॅप’ विभागात होते. ‘मिड कॅप फंड’च्या माध्यमातून मिड कॅप प्रकारातील मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अशाप्रकारच्या कंपन्या काहीशा स्थिरस्थावर झालेल्या असल्या, तरी लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या वाढीसाठी आणखी बराच वाव असतो. त्यामुळे एकंदरीत पाहता मिड कॅप फंडमध्ये केलेल्या… Continue reading मिड कॅप म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

लार्ज कॅप म्युच्युअल फंड

‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात सेबीने निर्धारित केलेल्या मानकांनुसार भांडवली बाजारात ज्या कंपन्या बाजारमूल्यानुसार पहिल्या १०० क्रमांकात मोडतात त्यांना ‘लार्ज कॅप’ म्हणून ओळखले जाते. ‘लार्ज कॅप फंड’च्या माध्यमातून शेअर बाजारातील ‘लार्ज कॅप’ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अशा कंपन्या स्थिरस्थावर झालेल्या असल्याने त्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची दोलायमानता इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी असते. इक्विटीमध्ये… Continue reading लार्ज कॅप म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडचे इतर प्रकार व उपप्रकार

‘म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार‘ या लेखात म्युच्युअल फंडचे प्रकार सांगताना ‘ढोबळमानाने’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला होता. कारण ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने म्युच्युअल फंडची जी वर्गवारी केली आहे, त्यात इक्विटी, डेट आणि हायब्रिड व्यतिरिक्त आणखी दोन अतिरिक्त प्रकार नमूद केले आहेत. आज आपण त्या दोन प्रकारांची आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपप्रकारांची माहिती घेणार… Continue reading म्युच्युअल फंडचे इतर प्रकार व उपप्रकार

म्युच्युअल फंड

हायब्रिड म्युच्युअल फंडचे ६ उपप्रकार

‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’ने निश्चित केलेल्या मानकांनुसार हायब्रिड फंडची ६ उपप्रकारांत विभागणी केली जाते. कोणतीही ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ (म्युच्युअल फंड कंपनी) या उपप्रकारांमध्ये प्रत्येकी केवळ १ योजना सुरू करू शकते. हायब्रिड किंवा बॅलन्स्ड फंडच्या ६ उपप्रकारांची माहिती आपण आजच्या या लेखात घेणार आहोत, पण तत्पूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते? हे… Continue reading हायब्रिड म्युच्युअल फंडचे ६ उपप्रकार

म्युच्युअल फंड

डेट म्युच्युअल फंडचे १६ उपप्रकार

डेट फंडशी निगडीत योजनांमध्ये स्पष्टता यावी यासाठी ‘सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सेबी’ने डेट फंडची १६ उपप्रकारांत विभागणी केली आहे. प्रत्येक ‘एएमसी’ (म्युच्युअल फंड कंपनी) या उपप्रकारांत प्रत्येकी १ योजना सुरू करू शकते. अशाने निरनिराळ्या एएमसी’च्या समान प्रकारच्या योजनांमधून योग्य अशी योजना निवडणे गुंतवणूकदारासाठी सोपे जाते. डेट फंडचे उपप्रकार पाहण्यापूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य… Continue reading डेट म्युच्युअल फंडचे १६ उपप्रकार

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडवरील कर संरचना

पूर्वी इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक करमुक्त असे, पण या वर्षापासून अशाप्रकारच्या गुंतवणुकीवर माफक सवलतीसह कर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इक्विटी, डेट आणि बॅलन्स्ड (हायब्रिड) फंडवर त्यांच्या स्वरूपानुसार, तसेच गुंतवणुकीच्या मुदतीनुसार निरनिराळ्या प्रकारे कर आकारण्यात येतो. आजच्या या लेखात आपण त्यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत. इक्विटी फंड SCGT (Short-term Capital Gain… Continue reading म्युच्युअल फंडवरील कर संरचना

म्युच्युअल फंड

इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार

कोणतीही ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ अर्थात ‘एएमसी’ (म्युच्युअल फंड कंपनी) जेंव्हा म्युच्युअल फंड योजना तयार करत असते, तेंव्हा ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सेबी’ने आखून दिलेल्या काही मानकांचे तिला पालन करावे लागते. निरनिराळ्या एएमसी’च्या समान प्रकारच्या योजनांमध्ये सुसूत्रता यावी हा त्यामागील उद्देश असतो. अशाने गुंतवणूकदाराला स्वतःसाठी योग्य योजना निवडणे सोपे जाते. ‘सेबी’ने इक्विटी प्रकारात… Continue reading इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार

म्युच्युअल फंड

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

फेसबुक, अमेझॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची यशोगाथा अनेकांना प्रभावित करत असते. त्यामुळे या कंपन्यांच्या दैदीप्यमान वाटचालीत कुठेतरी सहभागी होता यावे असे एखाद्याला वाटू शकते, परंतु त्यासाठीचा सहजसोपा मार्ग मात्र त्यास ठाऊक असतोच असे नाही. अशावेळी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय कामी येऊ शकतो. कारण म्युच्युअल फंडद्वारे आपणाला केवळ भारतीय शेअर बाजारात नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांतही… Continue reading आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार

गुंतवणूकदारांच्या निरनिराळ्या गरजा लक्षात घेऊन म्युच्युअल फंड योजना देखील वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश या सर्व प्रकारांची माहिती आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी ढोबळमानाने म्युच्युअल फंडचे जे ३ मुख्य प्रकार आहेत, त्यांची अगदी थोडक्यात माहिती घेऊ. इक्विटी फंड : अधिक परतावा, अधिक दोलायमानता शेअर बाजाराच्या माध्यमातून निरनिराळ्या कंपन्या भविष्यातील आपल्या वाढीसाठी गुंतवणूकदारांकडून… Continue reading म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार