मराठी महाराष्ट्र

मराठी माध्यमांकडून सुरू असलेली फसवणूक

जेंव्हा तुम्हाला वेळोवेळी गृहीत धरले जाते, तेंव्हा तो तुमच्या अस्तित्त्वाला अंकित करण्यासाठी केलेला एक कट असतो. प्रत्येक मराठी माणसाला हिंदी येते हे माध्यमांचे गृहीतक देखील असेच मराठी संस्कृतीला अंकित करू पहात आहे. आजच्या काळात मराठी माध्यमांतून केवळ हिंदी भाषेचाच नव्हे, तर हिंदी कार्यक्रमांचा देखील संचार होऊ लागला आहे. यास भाषिक उदारतेचा कितीही सोनेरी मुलामा दिला,… Continue reading मराठी माध्यमांकडून सुरू असलेली फसवणूक

मराठी महाराष्ट्र

marhathi.com : चळवळीचे एक उत्स्फूर्त संकेतस्थळ!

समाजमाध्यमावर लिहिणे म्हणजे अगदी प्रभावीपणे हवेत बोलण्यासारखे आहे. यावर लिहिलेले शब्द ज्या गतीने सर्वदूर पोहचतात, त्याच गतीने ते हवेत विरुनही जातात. दुसऱ्या बाजूला संकेतस्थळावर लिहिलेला एखादा लेख हा मागे पडत नाही किंवा हरवून जात नाही, तर तो कायम शोधण्याच्या अंतरावर उपलब्ध राहतो, ज्याचा पुढे संदर्भासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे समाजमाध्यमाच्या काळातही अनुदिनी (blog) आणि… Continue reading marhathi.com : चळवळीचे एक उत्स्फूर्त संकेतस्थळ!

राजकारण

डॉनल्ड ट्रम्प : किमयागार की कॉन आर्टिस्ट?

कोणत्याही क्षेत्रात जर सर्वोच्च पदावर पोहचायचं असेल, तर एक तर तुम्हाला सर्वोत्तम असावं लागतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही सर्वोत्तम आहात हे तुम्हाला माहीत असावं लागतं. सर्वोत्तम असणं हे अव्यक्त असू शकतं, चांगल्या किंवा वाईट गुणवैशिष्ट्यांचं मिश्रण असू शकतं, पण जो खरंच सर्वोत्तम असतो, त्याला त्याच्या अंतरातम्यातून माहीत असतं की तो सर्वोत्तम आहे! काहीजण ट्रम्पनां जगातील… Continue reading डॉनल्ड ट्रम्प : किमयागार की कॉन आर्टिस्ट?

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडचे इतर प्रकार व उपप्रकार

'म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार' या लेखात म्युच्युअल फंडचे प्रकार सांगताना 'ढोबळमानाने' हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला होता. कारण 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने म्युच्युअल फंडची जी वर्गवारी केली आहे, त्यात इक्विटी, डेट आणि हायब्रिड व्यतिरिक्त आणखी दोन अतिरिक्त प्रकार नमूद केले आहेत. आज आपण त्या दोन प्रकारांची आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपप्रकारांची माहिती घेणार… Continue reading म्युच्युअल फंडचे इतर प्रकार व उपप्रकार

म्युच्युअल फंड

हायब्रिड म्युच्युअल फंडचे ६ उपप्रकार

'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया' अर्थात 'सेबी'ने निश्चित केलेल्या मानकांनुसार हायब्रिड फंडची ६ उपप्रकारांत विभागणी केली जाते. कोणतीही 'अॅसेट मॅनेजमेंट कंपनी' (म्युच्युअल फंड कंपनी) या उपप्रकारांमध्ये प्रत्येकी केवळ १ योजना सुरू करू शकते. हायब्रिड किंवा बॅलन्स्ड फंडच्या ६ उपप्रकारांची माहिती आपण आजच्या या लेखात घेणार आहोत, पण तत्पूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते? हे… Continue reading हायब्रिड म्युच्युअल फंडचे ६ उपप्रकार

म्युच्युअल फंड

डेट म्युच्युअल फंडचे १६ उपप्रकार

डेट फंडशी निगडीत योजनांमध्ये स्पष्टता यावी यासाठी 'सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' म्हणजेच 'सेबी'ने डेट फंडची १६ उपप्रकारांत विभागणी केली आहे. प्रत्येक 'एएमसी' (म्युच्युअल फंड कंपनी) या उपप्रकारांत प्रत्येकी १ योजना सुरू करू शकते. अशाने निरनिराळ्या एएमसी'च्या समान प्रकारच्या योजनांमधून योग्य अशी योजना निवडणे गुंतवणूकदारासाठी सोपे जाते. डेट फंडचे उपप्रकार पाहण्यापूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य… Continue reading डेट म्युच्युअल फंडचे १६ उपप्रकार

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडवरील कर संरचना

पूर्वी इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक करमुक्त असे, पण या वर्षापासून अशाप्रकारच्या गुंतवणुकीवर माफक सवलतीसह कर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इक्विटी, डेट आणि बॅलन्स्ड (हायब्रिड) फंडवर त्यांच्या स्वरूपानुसार, तसेच गुंतवणुकीच्या मुदतीनुसार निरनिराळ्या प्रकारे कर आकारण्यात येतो. आजच्या या लेखात आपण त्यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत. इक्विटी फंड SCGT (Short-term Capital Gain… Continue reading म्युच्युअल फंडवरील कर संरचना

म्युच्युअल फंड

इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार

कोणतीही 'अॅसेट मॅनेजमेंट कंपनी' अर्थात 'एएमसी' (म्युच्युअल फंड कंपनी) जेंव्हा म्युच्युअल फंड योजना तयार करत असते, तेंव्हा 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' म्हणजेच 'सेबी'ने आखून दिलेल्या काही मानकांचे तिला पालन करावे लागते. निरनिराळ्या एएमसी'च्या समान प्रकारच्या योजनांमध्ये सुसूत्रता यावी हा त्यामागील उद्देश असतो. अशाने गुंतवणूकदाराला स्वतःसाठी योग्य योजना निवडणे सोपे जाते. 'सेबी'ने इक्विटी प्रकारात… Continue reading इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार

तंत्रज्ञान

किंडल : वाचनाची नवी अनुभूती

एखाद्या वस्तूची आपल्याला खरेच गरज आहे किंवा नाही? हे आपल्याला ठाऊक नसते, तेंव्हा ती वस्तू अशावेळी विकत घ्यावी जेंव्हा तिची किंमत खूप जास्त उतरलेली असते. ऑनलाईन शॉपिंग साईटवर पुन्हा एकदा 'डेज्' सुरू झाले, तेंव्हा यावेळी कोणतीही वस्तू विकत घ्यायची नाही असे मी ठरवले होते, पण 'किंडल पेपरव्हाईट' केवळ ~६५०० रुपयांना मिळत असताना मला ही सवलत… Continue reading किंडल : वाचनाची नवी अनुभूती

अर्थकारण

बाजारमूल्यानुसार कंपन्यांची वर्गवारी आणि गुंतवणूक

अॅपल कंपनीने १ ट्रिलियन डॉलरचे विक्रमी बाजारमूल्य गाठल्याची बातमी मध्यंतरी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. अॅपल पाठोपाठ अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट (गुगल) या कंपन्या देखील १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या सर्व कंपन्यांच्या बाजारमूल्यावरून आपणाला त्यांच्या भव्यतेची कल्पना आली असेल. या आघाडीच्या कंपन्यांचे जसे बाजारमूल्य आहे, तसेच शेअर बाजारातील प्रत्येक कंपनीचे आपले स्वतःचे एक बाजारमूल्य… Continue reading बाजारमूल्यानुसार कंपन्यांची वर्गवारी आणि गुंतवणूक