तंत्रज्ञान

सोलर पॉवर बँक

मला स्वतःला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची मनापासून आवड आहे. त्यामुळे काही काळापूर्वी मी सहजच एक ‘सोलर पॉवर बँक’ विकत घेतली होती. या पॉवर बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती उन्हामध्ये चार्ज होऊ शकते आणि त्यानंतर आपणाला आपला स्मार्टफोन या पॉवर बँकवर चार्ज करता येतो. थोडक्यात अप्रत्यक्षपणे सूर्याच्या ऊर्जेवर आपण आपला स्मार्टफोन चालवू शकतो. अंधारात व्यवस्थित दिसावे यासाठी यात मागील बाजूस मोठी एलइडी फ्लॅशलाईट आहे, तर नेहमीच्या पॉवर बँकप्रमाणे बाजूला एक लहान एलइडी बल्ब देखील आहे, जो आपण रात्रभर तेवत ठेवू शकतो. ही पॉवर बँक केवळ सौरऊर्जेवर चार्ज होते असे नाही, तर गरज पडल्यास आपण ती नेहमीप्रमाणे सॉकेटला लावूनही चार्ज करू शकतो.

सोलर पॉवर बँक
सौर ऊर्जेवर चार्ज होणारी सोलर पॉवर बँक

माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, या पॉवर बँकेवरील सोलर पॅनल लहान असल्याने ती व्यवस्थित चार्ज होण्यास बराच वेळ लागतो, पण ज्यांना भ्रमंतीची आवड आहे त्यांनी आपल्यासोबत ही पॉवर बँक बाळगण्यास हरकत नाही. प्रवासात वेळप्रसंगी हिचा चांगला उपयोग होऊ शकतो. माझ्याप्रमाणेच आपल्याला जर अपारंपरिक ऊर्जा साधनांची आवड असेल, तर थेट वीज निर्माण करणारी ही पॉवर बँक आपणाला नक्की आवडेल! ही सोलर पॉवर बँक आपल्याला विकत घ्यायची असेल, तर ती अमेझॉनवर उपलब्ध आहे.