म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडवरील कर संरचना

पूर्वी इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक करमुक्त असे, पण या वर्षापासून अशाप्रकारच्या गुंतवणुकीवर माफक सवलतीसह कर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इक्विटी, डेट आणि बॅलन्स्ड (हायब्रिड) फंडवर त्यांच्या स्वरूपानुसार, तसेच गुंतवणुकीच्या मुदतीनुसार निरनिराळ्या प्रकारे कर आकारण्यात येतो. आजच्या या लेखात आपण त्यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत.

इक्विटी फंड

SCGT (Short-term Capital Gain Tax)

१ वर्षाच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास जो काही फायदा होईल (Short Term Capital Gain) त्यावर १५% इतका कर लावला जातो.

LCGT (Long-term Capital Gain Tax)

१ वर्षांनंतर गुंतवणूक काढून घेतल्यास १ लाखाच्या वर जो काही फायदा झाला असेल (Long Term Capital Gain) त्यावर १०% इतका कर आकाराला जातो.

डेट फंड

SCGT (Short-term Capital Gain Tax)

३ वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास जो काही फायदा झाला असेल (Short Term Capital Gain) तो वार्षिक उत्पन्नात जोडून त्यावर व्यक्तीच्या प्राप्तिकर मर्यादेप्रमाणे कर आकाराला जातो.

LCGT (Long-term Capital Gain Tax)

३ वर्षांनंतर गुंतवणूक काढून घेतल्यास जो काही फायदा झाला असेल (Long Term Capital Gain) त्यावर इंडेक्सेशनच्या फायद्यासह २०% दराने कर आकाराला जातो.

बॅलन्स्ड फंड (हायब्रिड फंड)

‘इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स्ड फंड’वर इक्विटी फंडप्रमाणे कर आकारला जातो, तर ‘डेट ओरिएंटेड बॅलन्स्ड फंड’वर डेट फंडप्रमाणे कर आकारला जातो.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला त्यावरील कर संरचना माहित असणे आवश्यक आहे. प्राप्तिकर भरतेवेळी ही माहिती उपयुक्त ठरते.