म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडचे इतर प्रकार व उपप्रकार

म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार‘ या लेखात म्युच्युअल फंडचे प्रकार सांगताना ‘ढोबळमानाने’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला होता. कारण ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने म्युच्युअल फंडची जी वर्गवारी केली आहे, त्यात इक्विटी, डेट आणि हायब्रिड व्यतिरिक्त आणखी दोन अतिरिक्त प्रकार नमूद केले आहेत. आज आपण त्या दोन प्रकारांची आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपप्रकारांची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंडचे उपप्रकार समजून घेणे आपल्यासाठी माहितीपूर्ण ठरेल.

सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स

१. रिटायरमेंट फंड : ज्या योजनांमधील गुंतवणूक कमीतकमी ५ वर्षे किंवा सेवानिवृत्त होईपर्यंत (यांपैकी जे आधी येईल ते) काढता येत नाही त्या योजनांचा समावेश रिटायरमेंट फंडमध्ये होतो.

२. चिल्ड्रन्ज् फंड : ज्या योजनांमधील गुंतवणूक कमीतकमी ५ वर्षे किंवा मुलगा प्रौढ होईपर्यंत (यांपैकी जे आधी येईल ते) काढता येत नाही, त्या योजनांचा समावेश चिल्ड्रन्ज् फंडमध्ये होतो.

ऑदर स्कीम्स

१. इंडेक्स फंडस् / इटीएफस् : अशाप्रकारच्या फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी ९५% रक्कम ही शेअर बाजाराशी निगडित एखाद्या इंडेक्समध्ये मोडणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.

२. एफओएफस् (ओव्हरसिज / डोमेस्टिक) : ‘फंड ऑफ फंडस्’मध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी ९५% रक्कम ही इतर म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवली जाते.

गुंतवणूकदाराच्या आयुष्याशी निगडित गरजा लक्षात घेऊन सोल्युशन ओरिएंटेड फंड तयार केले जातात, तर ‘इंडेक्स फंड’ अथवा ‘फंड ऑफ फंडस्’मुळे गुंतवणुकीला काहीशी स्थिरता प्राप्त होते. गुंतवणूकदार आपल्या एकंदर परिस्थितीचा विचार करून स्वतःसाठी योग्य अशी म्युच्युअल फंड योजना निवडू शकतो.